Open Access Open Access  Restricted Access Subscription Access

ग्रामीण भागातील घटस्फोटीत स्त्रियांसाठी प्रभावी आधार व्यवस्थेची गरज व महत्व (विशेष संदर्भ जळगाव जिल्हा)

एस. आय. कुंभार, श्वेता विनोद वैद्य

Abstract


आज घटस्फोटाची समस्या केवळ महानगरांपुरतीच मर्यादित राहिलेली नसून ग्रामीण भागातील स्त्रियांना देखील या समस्येची झळ बसत आहे. शहरातील स्त्रिया शिकलेल्या असल्यामुळे आर्थिक समस्यांना फारसे सामोरे जावे लागत नाही. परंतु ग्रामीण भागातील स्त्रिया बहुतांशी अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असतात, त्यातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी फारश्या उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत जर घटस्फोट झाला तर त्यांना अनेक सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी स्त्रियांना आधाराची गरज असते, ती शक्यतो त्यांच्या आई वडिला कडूनच मिळते अथवा जवळच्या नातेवाईकांकडून मिळतो पण तो आधार त्यांना तहहयात मिळत नाही. अथवा तो मिळवण्यात अनेक अडचणी येतात.  आई वडिलांच्या पश्चात  घटस्फोटीत ग्रामीण स्त्रियांची जबाबदारी फारशी कोणी घेत नाही. म्हणून ग्रामीण भागातील घटस्फोटीतस्त्रियांना शाश्वत आर्थिक, सामाजिक आधाराची गरज भासते. नेमकी हीच बाब प्रस्तुत अभायाद्वारे अधोरेखित झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील ३६३ घटस्फोटीत महिलांकडून संकलित केलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या साठी प्रभावी, शाश्वत  अशा आधार व्यवस्थेची गरज किती महत्वाची आहे यावर प्रस्तुत अभ्यासाद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


Full Text:

PDF

References


१. प्रा. पी. के. कुलकर्णी (१९९८), “भारतातील सामाजिक समस्या”, विद्या प्रकाशन, नागपूर.

२. डी. एम. कोटस्थाने (२००७), “घटस्फोटाचे सामाजिक दुष्परिणाम”, पसायदान, अंक १३, भारतीय शिक्षण संस्था, पुणे.

३. भा. की. खडसे (२००९), “भारतातील सामाजिक समस्या”, श्री. मंगेश प्रकाशन, नागपूर.

४. मो. के. हसबनीस, (२००१), “परित्याक्ता स्त्रियांच्या सामाजिक समस्या”, ‘पसायदान’ अंक २, भारतीय शिक्षण संस्था, पुणे.

५. रा. ज. लोटे (२००७), “भारतातील सामाजिक संरचना आणि सामाजिक समस्या”, पिंपसपुरे पब्लिशर्स, नागपूर.

६. अॅड. व्ही.एम. बारहाते, (२००२), “हिंदू धर्म व हिंदू विवाह कायदा १९५५”, हाकारा अंक ५, सप्टेंबर-ऑक्टोबर २००२.

७. पी. डी. हरसुले (१९९२), “हिंदू विवाह आणि घटस्फोट कायदा (अधिनियम सन १९९५ चा २५ वा)”, मुकुंद प्रकाशन, ठाणे.

८. नदिया हुसेन आणि यास्मिन अशाय, (२००२), “A study on Impact of Divorce Upon the Attitude and Social Relations of Women in Shrinagar District”, Institute of Home Science, University of Kashmir Publication.

९. के. जी. कावले (१९८५), “Divorce Problems: A Sociological Study,” Ph.D. Study, Marathwada University.


Refbacks

  • There are currently no refbacks.


Copyright (c) 2017 S.I. Kumbhar, Shweta Vinod Vaidya